या 3 राशींच्या कुंडलीत शनिदेव बनवत आहेत महापुरुष राजयोग, त्यांना 88 दिवस शुभ फळ देणार.

ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेव अडीच वर्षांनी आपली राशी बदलतात . तथापि, विशेष परिस्थितीत शनिचे संक्रमण त्यापूर्वीच होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 12 जुलै 2022 पासून शनिदेव प्रतिगामी अवस्थेत मकर राशीत विराजमान आहेत. शनिदेव 23 ऑक्टोबर 2022 पर्यंत या स्थितीत राहणार आहेत.

या काळात शनिदेव 3 राशीच्या कुंडलीत महापुरुष राजयोग बनवत आहेत. ज्या राशीमध्ये हा राजयोग तयार होतो त्यांच्यासाठी हा राजयोग अत्यंत शुभ असल्याचे ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांचे मत आहे. चला जाणून घेऊया ज्योतिषीय गणनेनुसार, महापुरुष राजयोग कोणासाठी विशेष मानला जातो.

मेष : ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी महापुरुष योग अत्यंत शुभ सिद्ध होईल. या योगाच्या शुभ प्रभावामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. राजकारणात असणाऱ्यांना या योगाचा विशेष लाभ होईल. यासोबतच या कालावधीत तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. याशिवाय नोकरीत असलेल्यांना बढतीचा लाभ मिळू शकतो. एकंदरीत ऑक्टोबरपर्यंतचा काळ विशेष फायदेशीर ठरणार आहे.

मिथुन : शनिदेवाने निर्माण केलेल्या महापुरुष योगाच्या प्रभावामुळे करिअर आणि नोकरीत उत्तुंग यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असणार आहे. ऑक्टोबरपर्यंतच्या काळात व्यवसायात फायदा होऊ शकतो. राजकीय क्षेत्रात पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात इतर स्त्रोतांकडून आर्थिक लाभाचे योग होतील. परदेशातील कामात लाभ मिळू शकतो. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.

कन्या : ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा हा राजयोग कन्या राशीच्या लोकांना अचानक लाभ देऊ शकतो. जवळपास सर्वच कामात तुम्हाला यश मिळेल. रखडलेल्या कामात प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. प्रवासातून धनलाभाचे योग येतील. व्यवसायात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील.